मीना तिरोडकर. नितीनची आत्येबहीण व नितीनदादांची एक साधक.
नितीनचे आणि माझे आजी-आजोबा, माझे बाबुमामा-सूनितामामी (नितीनचे आई-वडील), आणि माझी 'मा' (प्रेमाआत्या) ही सर्व नाम धारी मंडळी म्हणजे फक्त नामच धारण करणारी. आजोबांना जरा वेळ मिळाला की त्यांचं बोटांच्या पेरावर नाम सुरू व्हायचं. आजी, सर्व आटोपल्यावर रात्री जपाला बसायची, ते ध्यानात जायची. बाबुमामाचे, आपण ऐकलेच आहे; शरीराने बिछाना पण मनाने नाम घट्ट पकडले होते. सुनीतामामीचे नाम पण जाज्वल्य असणार कारण स्वतः श्रीमहाराज तिच्या उदरी जन्माला आले. प्रेमाआत्याला आपण सर्वच ओळखतो. तिच्या माळेवर महाराज आले आहेत. लहानपणापासून माझा आजोळी ओढा जास्त. का, हे आता कळतंय. बाबुमामा, सुनीतामामी आणि मा ह्यांची मी लाडकी होते आणि अचानक लोक म्हणायला लागले आता तुझे लाड होणार नाहीत, मामा-मामीना बाळ होणार. छोटी मी घाबरून गेले तरी आत सतगुरू जागृत होते त्यांनी त्या छोट्या मीनातर्फे शांतपणे उत्तर दिले, "मी बाळाचे लाड करीन." ते बाळ म्हणजेच माझा नितीन. मी त्या वयात त्या बाळाचे किती लाड केले माहीत नाही पण त्या निर्मळ उत्तरावर प्रसन्न होऊन, नितीन माझ्याकडे पारमार्थिक प्रेमाचे लोटचे लोट पाठवत आहे.
नितीनची शिकवण आहे की लहान मुलासाखे निर्मळ मन असावं. त्याला आवडते ते देऊ म्हटले तर तेवढे नाम पण माझ्या कडून होत नाही. पण मी प्रयत्न करत रहाणार.
जय सतगुरु जय श्रीराम
06-06-2020 09:38 pm / POSTED BY : Meena Tirodkar / Where the Experience took place : स्थळ. दादर मुंबई. 1961.